बोलताना शब्दांचा अतिशय विचारपूर्वक वापर केला पाहिजे.
शब्दांच्या शस्त्राला इतकी धार असते की, त्याने केलेल्या वारांची जखम सहजासहजी भरून निघत नाही. आणि भरून निघालीच तरी ती अधूनमधून चिघळत राहतेच.
✒️ K. Satish
बोलताना शब्दांचा अतिशय विचारपूर्वक वापर केला पाहिजे.
शब्दांच्या शस्त्राला इतकी धार असते की, त्याने केलेल्या वारांची जखम सहजासहजी भरून निघत नाही. आणि भरून निघालीच तरी ती अधूनमधून चिघळत राहतेच.
✒️ K. Satish
एखादा साधा कागद जर रस्त्यात पडला असेल, तर लोक एकतर त्याला दुर्लक्षित करतात किंवा त्याला लाथाडून, तुडवून पुढे निघून जातात.
परंतु , तोच कागद एखाद्या 100, 200, 500, 2000 च्या नोटेचं स्वरूप प्राप्त झाल्यावर पडलेला दिसला तर त्याला आपलेसे करण्यासाठी लोकांमध्ये चढाओढ लागते.
मनुष्याच्या बाबतीतही असेच घडते.......
✒ K. Satish
रात्रीच्या काळोखात पडणार्या चांदण्यांच्या
प्रकाशाची रंगत भलतीच न्यारी असते,
अन् अपयशाच्या गुहेमध्ये पडणार्या
यशाच्या किरणांची मजा खरंच भारी असते...
✒ K. Satish
एक गहण सामाजिक प्रश्न..... खरंच मातापित्यांनी मुलांना जन्म देणे हे त्या मुलांवर उपकार असतात का ?, त्यांना या जगात आणून त्यांनी या मुलांवर मोठी मेहेरबानी केलेली असते का ?
हा प्रश्न पडण्याचे कारण की, समाजात सर्व स्तरावर मुलांना या गोष्टीची सतत जाणीव करून दिली जाते की, तुझ्या आई वडीलांमुळेच तू हे जग पाहू शकलास आणि ते अजिबात खोटे नाही. निश्चितच त्यांच्या आईवडिलांचे मिलन झालेच नसते तर ही मुले जन्माला खरोखरच आली नसती.
परंतु, मुद्दा हा उरतो की, या मुलांवर उपकार करण्यासाठीच सर्व आई वडीलांनी मुलांना जन्म दिलेला असतो का ?....की, आपल्याला मुलाचे सुख लाभावे, समाजात आपल्याला मूल झाले याचा आनंदोत्सव साजरा करता यावा, ' मूल होत नाही ' अशा समाजातील टोचून बोलणाऱ्या टोमण्यांपासून आपला बचाव व्हावा व सामाजिक स्वास्थ्याच्या हेतूने लग्नबंधनात अडकून आपल्या शारिरीक गरजा भागाव्यात या सर्व गोष्टी त्यामागे नाहीत का ?
माणसाने स्वतःच्या आनंदासाठी मूल जन्माला घातल्यानंतर त्याच्यावर उपकाराची भाषा करून त्याला या गोष्टीची जाणीव करून देण्याची पद्धत मोडीत निघायला हवी. सर्व सजीवांची उत्पत्ती हे निसर्गचक्र आहे. आपण फक्त निमित्तमात्र असतो. त्यामुळे सर्व मातापित्यांनी आपल्या मुलांवर फक्त जन्म दिला म्हणून अधिकारवाणीने हक्क गाजवून त्यांना चुकीच्या गोष्टीदेखील करायला भाग पाडणे अथवा त्यांच्यावर अत्याचार करणे हे या निसर्गचक्राचा गैरवापर केल्यासारखेच आहे.
त्यामुळे प्रत्येक मातापित्याने आपल्या मुलांना फक्त जन्म दिला म्हणून अधिकार गाजवणे बंद केले पाहिजे व समाजानेही या विधानाचा ऊहापोह करून मुलांना फक्त ज्ञानाचे डोस पाजून कात्रीत पकडण्याऐवजी या मुलांना जीव लावावा, त्यांना माता पिता या नात्याने तुमचे प्रेम द्यावे, आपुलकी आणि जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित करावेत आणि फक्त जन्म दिला म्हणून नाही तर तुमच्या सुस्वभावाने, चांगल्या वर्तणुकीने, मायेने त्यांची मने जिंकावीत...
✒ K.Satish
हिकडंबी झाला धिंगाणा
आन् तिकडंबी झाला धिंगाणा,
कोण कुणाच्या मागं लागलं
काहीचं आता समजंना,
हातातं देतो हातं कुणी
पाय अचानक वढतो,
गोंधळं गोंधळं गोंधळं
सगळा गोंधळं गोंधळं गोंधळं
गोंधळं गोंधळं गोंधळं
सगळा गोंधळं गोंधळं गोंधळं
✒ K. Satish
समाजात काही नाती ही अतिशय आदरणीय असतात. परंतु त्याला अपवाद असणाऱ्या प्रवृत्तीची अनेक उदाहरणेही याच समाजात आपल्याला पहावयास मिळतात. त्यामुळेच तर जन्मदात्या पित्याकडूनच स्वतःच्या मुलीवरच अत्याचार करण्याच्या घटना असो, स्वतःच्या स्वार्थापोटी व व्यभिचारापोटी स्वतःच्याच मुलांची हत्या करणारी माता असो वा आर्थिक लोभ किंवा वासनेपोटी आपल्या शिष्यांचे शोषण करणारे गुरूजन असो ...अशी दुष्ट प्रवृत्तीची माणसे या महान नात्यांच्या आडून आपल्या वाईट मनसुब्यांना पूर्णत्वास नेत असतात.
समाजात नेहमी माता, पिता, गुरूतुल्य व्यक्ती, आध्यात्मिक व्यक्ती यांना नात्याच्या आधारे अथवा समाजातील आदरणीय स्थानाच्या आधारे झुकते माप दिले जाते. आणि नेमका याच गोष्टीचा फायदा अशी नात्यांच्या आड दडलेली काही अपप्रवृत्तींची मंडळी घेतात व आपल्या दुष्कृत्यांना अंमलात आणून अनेक निष्पापांचे आयुष्य उध्वस्त करून टाकतात. आणि त्यामुळेच अनेकदा नकळतपणे समाजाची भूमिकादेखील अशा चुकीच्या गोष्टी घडण्याला बळ देणारी ठरते.
अतिशय खालच्या पातळीवर घसरून नात्यांना काळिमा फासणाऱ्या व्यक्तींना केवळ नात्यांचा मान राखण्याची पारंपारिक औपचारिकता पूर्ण करण्याहेतूने मान देण्याचा अट्टाहास करण्याची समाजातील मानसिकता ही मानवता व माणुसकीचा गळा दाबून हत्या करण्यासमान आहे.अशामुळेच अनेक अपप्रवृत्तींच्या व्यक्ती केवळ नात्याचा आधार घेऊन व समाजाची सहानुभूती मिळवून इतर निष्पापांच्या आयुष्याशी खेळण्यात यशस्वी होतात.
म्हणूनच म्हणतो की,
काही व्यक्तींना सतत दुसर्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कपट कारस्थान करण्याची सवय असते. त्याअन्वये इतरांना दुःखी करण्याचा त्यांचा मानस असतो.
परंतु , अशा व्यक्तींना आयुष्यात कधीच आनंदाची खरी परीभाषा उमजू शकत नाही. कारण ते स्वतःच्या सुखापेक्षा इतरांच्या दुःखातच जास्त आनंदी होत असतात.
आणि अशा आनंदाचे आयुष्य अगदीच क्षणभंगुर असते.
✒ K. SATISH
आजच्या युगात लोकांचा अहंकार इतका वाढला आहे की, आपण केलेल्या चुकीच्या कृतीची कालांतराने प्रचिती आली तरीही इतरांसमोर त्या कृतीचे समर्थन करून तिच्याविषयी गुणगान गाण्याचा अहंकारी आणि स्वतःबरोबरच इतरांचेही नुकसान करण्याचा बालिश प्रकार वाढीस लागला आहे.
उदाहरणच द्यायचे झाले तर आपण घेतलेले कपडे, आपण घेतलेली गाडी, आपण घेतलेले घर, आपण जेथे जेवायला गेलो ते हाॅटेल, आपण खरेदी केलेले दागिने...इत्यादी अनेक गोष्टी ज्या आपण स्वतः खरेदी केलेल्या आहेत आणि ज्या गोष्टींचा आपण स्वतः निर्णय घेऊन उपभोग घेत आहोत. या सर्व गोष्टी प्रत्येकात असलेल्या अहंकारी स्वभावामुळे माझी वस्तू इतरांपेक्षा कशी चांगली आहे हे सांगण्याच्या नादात बहुतांशी वेळा लोक आपलेच नुकसान करून बसतात. आणि स्वतःचा चुकलेला निर्णय इतरांसमोर मान्य करण्यात कमीपणा वाटत असल्याने आतल्या आत घुसमटत राहून त्या निर्णयाचे वाईट परिणाम भोगत राहतात. व त्यांच्या या चुकीच्या वृत्तीमुळे इतर लोकांनी त्यांच्या एखाद्या निर्णयाचे अनुकरण केल्यास ते सुद्धा आपसूकच खड्डयात पडतात. आणि मग त्यांनी याविषयी चर्चा केल्यानंतर ही मंडळी त्यांना आपल्या चुकलेल्या निर्णयाविषयी बोलून दाखवतात, परंतु तोपर्यंत त्याने स्वतःचे नुकसान केलेलेच असते त्याबरोबरच इतरांच्या नुकसानालाही तो कारणीभूत ठरलेला असतो.' जीवन '... प्रत्येकाला जीवनात अंधारमय क्षणांना तोंड द्यावे लागते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कौटुंबिक जबाबदारी पार पाडत असताना अशा क्षणांचा सामना करण्यासाठी स्वतःला सज्ज करावे लागते. या अंधारमय क्षणांवर मात करून उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल करण्याकरिता सतत प्रयत्नांचे प्रकाशमय दिवे तेवत ठेवण्याची आवश्यकता असते.
परंतु , बहुतांशी लोक हे दुसर्याच्या जीवनातील अंधार पाहून खुश होत असतात. किंबहुना हा अंधार अजून गडद कसा होईल यासाठी प्रयत्नशील असतात. पण दुसर्याच्या जीवनातील अंधाराचा आनंद घेण्याच्या आणि तो अजून काळाकुट्ट करण्याच्या नादात असे लोक आपल्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी लागणारे पुरेसे प्रयत्न करण्यास विसरूनच जातात. व दुसर्याचे आयुष्य अंधारमय बनवण्याच्या नादात स्वतःच कधी अंधाराच्या गर्द छायेत स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला ढकलून देण्यास कारणीभूत ठरतात हे त्यांना कळतच नाही.
अंधार दुसर्याच्या जीवनातला
पाहूनी होतो आनंद का ?,
कपट मनामध्ये ठेवून असा रे
आयुष्यामध्ये जगतो का ?
वृत्ती नाही चांगली ही तर
घातक ठरेल तुलाच रे,
मन तू निर्मळ कर स्वतःचे
दिशा नवी जीवनाला दे
✒ K. Satish
कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...