Sunday, July 19, 2026

हुकूमशाहीचे सांगाडे

अन्यायाचे दिवस नक्कीच सरतील
सगळ्या भ्रष्टाचाऱ्यांचे दिवस नक्कीच भरतील
सामान्य जनतेच्या लढ्याने पेटलेल्या क्रांतीने
हुकूमशाहीचे सांगाडे उरतील

✒️ K. Satish




Sunday, July 12, 2026

स्वाभिमानाचा निर्धार...

खोट्या आरोपांचे ओझे खूप दिवस वाहिले,
विश्वासघाताचे विषही मुकाट्याने पचविले.

हळव्या मनाला कठोर बनवणे अपरिहार्य झाले आहे,
जे जसे वागले, त्यांना तसेच उत्तर देण्याचा विचार आहे

सहनशीलतेला अनेकांनी कमजोरी समजली,
मौनालाच हार समजून किंमतच विसरली.

आता ना माफी, ना खोट्या नात्यांचा आधार,
स्वाभिमानासाठीच उभा आहे माझा प्रत्येक विचार.

✒️ K. Satish






Saturday, June 20, 2026

जपावा नैसर्गिक साधनसंपत्तीचा ठेवा

बंगला, गाडी, पैशाहूनही
श्रेष्ठ नैसर्गिक संपत्ती,
नीट जतन केलीत तर टळेल
भविष्यातील मोठी आपत्ती

✒️ K. Satish






Saturday, May 30, 2026

चाल कुणाची ?

पेट्रोलमध्ये इथेनॉल
दारूत मिसळती मिथेनाॅल
कायदा-सुव्यवस्था धाब्यावर
सांगा लोकहो कुणाची ही चाल ?

✒️ K. Satish





Thursday, May 28, 2026

खरा सहाय्यक

तुमच्या गुणांची टिंगल करून, उचित ध्येय गाठण्यापासून तुम्हाला परावृत्त करून, तुमचे मानसिक खच्चीकरण करणारे मित्रदेखील तुमच्या प्रगतीला मारक ठरू शकतात....
तर,
तुमच्या गुणांची कदर करून तुम्हाला प्रोत्साहन देणारे शत्रूदेखील तुमच्या प्रगतीला पूरक ठरू शकतात...!!!
✒️ K. Satish





Tuesday, May 26, 2026

दोगलापन

किसानों से हो रही नाइंसाफी
पेट्रोल के दाम बढे है,
कल थे जो विरोध मे इसके
आज समर्थन में खडे है ।

✒️ K. Satish



Wednesday, May 13, 2026

दगाबाज

स्वार्थी नेत्यांचे बनूनी गुलाम
मित्राशी केला कावा,
नक्कीच होईल पश्चाताप
आहे हा माझा दावा

✒️ K. Satish




कर्तृत्व

कर्तृत्व असे नसावे की, जे स्वतःच्या तोंडून सांगावे लागेल   कर्तृत्व असे असावे की, जे लोकांना दिसावे व त्यांनीच त्याची चर्चा करावी ✒ K. Satis...