वाढदिवस म्हणजे काय?
आपण ह्या पृथ्वीतलावर जन्म घेतलेल्या दिवसाची आठवण...
आपल्या अस्तित्वाने प्रफुल्लित होणाऱ्या लोकांकडून व्यक्त होणार्या प्रेमरूपी सागरात डुंबणे...
जीवनयात्रेत पुढे पुढे मार्गक्रमण करताना दिवसागणिक आलेल्या अनुभवांच्या वृद्धिंगत झालेल्या साठ्यामुळे आपल्या परिपक्वतेत वाढ झाल्याचा अनुभव...
आयुष्यामध्ये आपल्या सुस्वभावामुळे, सहकार्याच्या भुमिकेमुळे, मधुर वाणीमुळे, बुद्धीचातुर्यामुळे, आणि चांगल्या कर्तृत्वाच्या जोरावर ज्यांच्या ज्यांच्या हृदयामध्ये आपल्यासाठी छोटीशी जागा निर्माण करण्यात यश आले असेल त्या सर्वांकडून प्रेमभावनेतून मिळालेल्या शुभेच्छांचा स्वीकार करणे...
✒ K. Satish

No comments:
Post a Comment